बजेटपूर्व सल्लामसलत बैठक
पणजी : 2 फेब्रुवारीपासून राज्याच्या अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यटन खाते, वित्त खाते आणि कृषी खात्यातील सूचना व हरकती मागवल्या आहेत. आगामी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्पही सादर करण्यात येणार असल्याने मुख्यमंत्री सावंत यांनी बजेटपूर्व सल्लामसलत बैठक घेतली. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, ही तिसरी अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत बैठक आहे. कर आकारणी, व्हिसा ऑन अरायव्हल, कर्ज याबाबतच्या सूचना आज संबंधितांनी सरकारला दिल्या आहेत. राज्याचा आनंद निर्देशांक वाढविण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त डिजिटायझेशन आणि बहुतांश सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.









