अनेकदा अनोख्या आणि अत्यंत दुर्लभ गोष्टी अशा ठिकाणी सापडतात, जेथे आम्ही कधीही विचारही केलेला नसतो. एका शालेय मुलासोबत काहीसा असाच प्रकार घडला आहे. शाळेत खेळत असताना त्याला मिळालेली वस्तू अत्यंत अनोखी आहे.

8 वर्षीय मुलाला सँडबॉक्समध्ये खेळताना एक दुर्लभ चांदीचे नाणे मिळाले, जे त्याच्या जन्मापासून सुमारे 1800 वर्षांपूर्वीचे आहे. बर्जने नावाचा मुलगा जर्मनीत स्वत:च्या प्राथमिक विद्यापीठात एका सँडबॉक्समध्ये खेळत असताना त्याला हे नाणे मिळाले आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये नाणे मिळाल्यावर तो उत्तर जर्मनीतील ब्रेमेन शहरात स्वत:च्या कुटुंबीयाला दाखविण्यासाठी घरी घेऊन गेला. बर्जनेच्या आईवडिलांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तर पुरातत्व तज्ञांनी हे नाणे रोमन साम्राज्याच्या काळात तयार करण्यात आले होते अशी माहिती दिली आहे.
सम्राट मार्कस ऑरेलियस एंटोनिनसच्या शासनकाळात रोमन दीनार म्हणून हे नाणे तयार करण्यात आले होते. एंटोनिनसने 161 ते 180 सालापर्यंत राज्य केले होते. यामुळे हे नाणे सुमारे 1800 वर्षे जुने आहे. अत्यंत झीज झालेल्या या नाण्याचे वजन 2.4 ग्रॅम आहे. रोमन साम्राज्याने महागाईच्या प्रत्यक्ष परिणामायच स्वरुपात स्वत:च्या चलनातील चांदीचे प्रमाण केले होते त्या काळातील या नाण्याची निर्मिती करण्यात आली होती अशी माहिती पुरातत्व तज्ञ उटा हाले यांनी दिली आहे.
जर्मनीच्या अनेक हिस्स्यांच्या विपरित ब्रेमेन कधीच रोमन साम्राज्याच्या अधीन नव्हते. येथे एक प्राचीन जर्मनिक समुदाय चौसीचे वास्तव्य होते, जे अनेकदा प्राचीन रोमनांसोबत व्यापार करायचे. ब्रेमेन स्मारक संरक्षण अधिनियमानुसार बर्जने या मुलाला हे नाणे स्वत:कडे बाळगता येणार नाही, कारण अशा नाण्यांना राज्याच्या मालकीचे मानले जाते. तरीही राज्याच्या पुरातत्व तज्ञांनी मुलाचे कौतुक करत त्याला पुरस्काराच्या स्वरुपात दोन पुस्तके प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. नाण्याला ब्रेमेनच्या फोके संग्रहालयात स्थान मिळणार असल्याचे हाले यांनी सांगितले आहे.









