राहूल देशपांडेचा स्वरवर्षाव : भजनी सप्ताहाला प्रारंभ
वार्ताहर / माशेल
माशेल येथील प्रसिद्ध चिखलकाला यंदा राज्य उत्सव म्हणून तीन दिवस साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमातंर्गत आषाढी एकादशीच्या दिवशी श्री देवकीकृष्ण मंदिरात 24 तासांच्या अखंड भजनी सप्ताहाला सुऊवात झाली. देऊळवाडा येथील भाविकांच्या उपस्थितीत सामुहिक गाऱ्हाणे घातल्यानंतर पुजारी सिद्धेश आचार्य यांच्याहस्ते समई प्रज्ज्वलीत कऊन भजनी सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला.
सुऊवातीचे भजन साने व साथी कलाकारांतर्फे सादर करण्यात आले. त्यानंतर महाशाला कलासंगम, रात्री प्रसिद्ध गायक अक्षय नाईक व साथी कलाकार, तसेच ऋषिकेश साने, संदेश खेडेकर, हर्षा गणपुले यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यांना हार्मोनियमवर गोपाळ प्रभू, तबल्यावर पं. तुळशीदास नावेलकर, मिलिंद पोरोब, मंजिरी गोविंद कवठणकर यांनी साथसंगत केली. आज शुक्रवार 30 रोजी सकाळी भजनी सप्ताहाची सांगता झाल्यानंतर चिखलकाला खेळला जाणार आहे. चिखलकाला महोत्सवाची सुऊवात बुधवार 28 रोजी रात्री प्रख्यात गायक राहूल देशपांडे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने झाली. भर पावसातही माशेल व आसपासच्या भागातील श्रोत्यांनी या कार्यक्रमाला अलोट गर्दी केली. एका बाजूला कोसळणाऱ्या पावसाच्या सरी व दुसरीकडे राहूल देशपांडे यांचा स्वरवर्षाव अशा अनोख्या वातावरणात हा कार्यक्रम रंगला.









