प्रतिनिधी/ पणजी
सरकारतर्फे स्वयंपूर्ण मित्र यामार्फत गावातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. याला ग्रामस्थांचा सहभागही उत्स्फूर्तपणे लाभत आहे. सोमवारी 24 रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वत: उपस्थित राहून साळगाव ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकूण घेऊन त्या तात्काळ निकालात काढणार आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्री साळगाव ग्रामस्थांशी संवाद साधणार असल्याचे पत्रक काढले आहे. ‘स्वयंपूर्ण गोवा’ या प्रमुख कार्यक्रमांतर्गत स्वयंपूर्ण मित्र म्हणून साळगाव ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात ते लोकांशी संवाद साधण्याबरोबरच त्यांच्या समस्यांचे निराकरण करणार आहेत, असे मुख्यमंत्री कार्यालयाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.









