वृत्तसंस्था / टोकियो
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या जपान खुल्या सुपर 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ऋतुपर्णा आणि स्वेतपर्णा पांडा भगिनींचे आव्हान महिला दुहेरीत पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात जपानच्या इशीकेवा आणि केवाझोई यांनी पांडा भगिनींचा 21-13, 21-7 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 32 मिनिटांत पराभव करत विजयी सलामी दिली. या स्पर्धेत बुधवारी पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन तसेच सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांचे पहिल्या फेरीतील सामने होतील.









