विदेशमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन ः
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जी-20 समुहासमोर जागतिक अर्थव्यवस्थेला संकटाच्या प्रभावातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधावे लागणार असल्याचे प्रतिपादन विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी केले आहे. जयशंकर यांनी भारतात नरेंद्र मोदींच्या सरकारने ग्राहकांना इंधनाच्या किमतीप्रकरणी दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हणत महागाई नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचे सांगितले आहे.
सुरक्षेचा अर्थ केवळ भौतिक आणि आर्थिक सुरक्षा नसतो हा धडा जगाने आता घेतला आहे. सुरक्षेचा अर्थ आरोग्य आणि अन्नसुरक्षा देखील आहे. याचमुळे आम्हला जागतिक अर्थव्यवस्थेला संकटाच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी मार्ग शोधावा लागणार असल्याचे ते म्हणाले. सप्टेंबरमध्ये राष्ट्रपती तसेच पंतप्रधान स्तरीय परिषदांसह चालू वर्षात जी-20 च्या 15 मंत्रिस्तरीय बैठका आयोजित होणार आहेत.
कोरोना महामारीने जगात एक अत्यंत खोलवल मनोवैज्ञानिक छाप सोडली आहे. तर विकसित देशांनी प्रकोपादरम्यान स्वतःचीच देखभाल केली आहे. भारत वगळता फारच कमी देशांनी उर्वरित जगाबद्दल विचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे जयशंकर यांनी हटले आहे.









