‘नेक्सस’ हे नुकतेच नोवाल हरारे यांचे ए. आय.चा एकूण भविष्यकालीन शक्यता स्पष्ट करणारे पुस्तक प्रकाशित झाले असून ही एक सर्वव्यापी आव्हानात्मक बाब समजून घेणे आवश्यक आहे. यातून मानवाची यंत्रगुलामी येण्याचा व एकूण मानवी जगत अडचणीत येण्याची शक्यता आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ए. आय.चा वापर आणि सध्या आधुनिक साधनांचा व यंत्राचा वापर यातील फरक हा आहे. प्रचंड मोठी माहिती किंवा विदा हाताळणे व त्यासाठी आवश्यक यंत्र क्षमता प्राप्त होत असून स्वनिर्णय घेणारी यंत्रे नजिकच्या भविष्य काळात तयार होतील. याची झलक स्वयंचलित (एडीएएस) प्रणाली असणारी ‘कार’ दर्शवते. महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रात जगाची विभागणी ए. आय. प्रथम व ए. आय. मागासलेले असे होऊन चीन व अमेरिका हे त्यात आताच अग्रगण्य असून संपूर्ण जग पादाक्रांत करण्याची त्यांची स्पर्धा तिसऱ्या महायुद्धाकडे नेऊ शकते. पण हे महायुद्ध माहिती तंत्राचे असणार असून त्यातून वित्तीय व इतर क्षेत्रात निर्माण होणारे अस्थैर्य अनेक प्रश्न निर्माण करतात.
वित्तीय स्थैर्याचे आव्हान
भांडवल बाजारात ए. आय. वापरातून वाढते वित्तीय अस्थैर्य कशा प्रकारे हाताळावे ही मोठी समस्या निर्माण झाली असून यासाठी वित्तीय स्थैर्य मंडळ (इएध्-इग्हहम्ग्aत् एtaंग्त्ग्tब् ँद्) जागतिक स्तरावर कार्यरत आहे. 6 मे 2010 मध्ये ‘फ्लॅश क्लॅश’ घटनेने ए. आय. बाल्यावस्थेत असताना कसा घोटाळा करू शकते हे स्पष्ट झाले. दुपारी अडीच वाजता केवळ 10 मिनिटात अमेरिकन शेअर बाजार 1000 अंकाने घसरुन 1 ट्रिलियन डॉलरचे नुकसान केले. नंतरच्या 30 मिनिटात 600 अंकाने वाढ झाली. याचा अहवाल 2015 मध्ये प्राप्त झाला व त्यात नविंदरसिंग सराओ दोषी सापडला. असाच प्रकार 2012 मध्ये व नंतर 2015 मध्ये घडून आला. आता जनरेटीव ए. आय. प्रगत होत असून प्रणालीगत जोखीम (एब्stास्atग्म् Rग्sक्) वाढली आहे. यामध्ये विदा पुरवणाऱ्या संस्थांवरील परावलंबन, विविध देशातील वित्त बाजारांचे परस्परावलंबन, सायबर जोखीम यांचा परिणाम म्हणून ए. आय. भांडवल बाजारात जोखीम निर्माण करीत आहे. काही मोठ्या तंत्र प्रगत कंपन्या एकत्रित येऊन मक्तेदारी निर्माण करू शकतात व ही मक्तेदारी प्रस्थापित कायद्यांना व्यवस्थित बगल देऊन स्थापित करू शकतात. ए. आय. तंत्र ज्या मॉडेलवर अवलंबून असते त्याची गुणवत्ता व त्यात वापरली जाणारी विदा हेही जोखीम वाढवतात.
नव तंत्रज्ञानाचा सर्वाधिक व सर्वप्रथम वापर वित्त व्यवसायात झालेला दिसतो. नफा अधिकाधिक व अल्पवेळेत मिळवण्याच्या उद्दिष्टासोबत आपल्या स्पर्धकांपेक्षा अधिक प्रगत पद्धती वापरण्यावर भर असतो. संगणकीकरण, स्वयंचलित पद्धती याला विस्तारणाऱ्या इंटरनेटने एक नवे क्षेत्र खुले झाले. केवळ आपल्या व्यवसायातच नव्हे तर इतरांच्या व्यवसायात सहभागी होणे. इतरांचे व्यवसाय ताब्यात घेणे अशा प्रकारची रचनात्मक विध्वंस (ण्rाatग्न एtrल्म्tग्दह) जी अर्थविचारवंत जोसेफ शुंपीटर यांनी सांगितली होती. त्याचा अनुभव येऊ लागला. ए. आय.च्या वाढत्या वापरातून वित्तीय क्षेत्रात विविध सकारात्मक परिणाम दिसत असून यातून व्यवसाय कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. विविध कागदपत्रांची तपासणी, नोंदणी या सोबत मशिन लँग्वेजच्या साहाय्याने विश्लेषण, भविष्यकालीन अंदाज या गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. अचूकता व वेग यांच्या एकत्रित परिणामातून व्यवसाय विस्तारणे शक्य झाले. केवळ त्याच त्या पद्धतीने व्यवसाय सेवा देण्याऐवजी नाविन्यपूर्ण पद्धतीने, ग्राहक केंद्रीत सेवा व अखंडपणे (24×7) सेवा देणे शक्य झाले आहे. हे सर्व कृत्रिम बुद्धिमतेचे आपण अनुभवत असणारे फायदे असून जनरेटीव ए. आय. यातून भविष्यकाळात अधिक व्यापक परिणाम दिसू लागतील. पिक्चर अभी बाकी है!
आहे चांगले तरी…
कोणतेही तंत्र हे वापरकर्त्यांच्या उद्देशावर व क्षमतेवर परिणाम घडवून आणत असते. कृत्रिम बुद्धिमतेचा भांडवल बाजारात वाढता वापर अपरिहार्य होत असून यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे, संभाव्य अडचणींकडे व निर्माण होणाऱ्या संकटांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ए. आय.च्या वापरातून रोजगार संधी मोठ्या प्रमाणात बदलणार असून त्यातून बेरोजगारीचा प्रश्न वाढू लागला आहे. एकूण 60 टक्के रोजगार ए. आय.ने प्रभावित होत असून उच्च कौशल्य व उच्च वेतन घेणाऱ्यांना याचा सर्वाधिक परिणाम जाणवणारा आहे. भांडवल बाजारात प्रचंड मोठा सांख्यिकी साठा किंवा विदा तितक्याच वेगाने त्याची प्रक्रिया होऊन निर्णय होत असल्याने अत्यंत छोट्या चुकीचे महाभयंकर परिणाम होऊ शकतात. अल्गोरिदमच्या प्रक्रियेत मूळ विदा चुकीचा, अपुरा, किंवा मुद्दाम त्रुटी असलेला वापरला गेल्यास सर्व निर्णय प्रक्रिया चुकीची होऊ शकते. विशेषत: जनरेटीव ए. आय. सर्व प्रकारची माहिती, सर्व स्तरातून संकलित करते. त्यामध्ये व्यक्तिगत माहितीचा गैरवापर सहज होऊ शकतो. विविध क्षेत्रातून तात्काळ व विपुल प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या माहितीचा तार्कीक अन्वयार्थ काढून घेतलेले निर्णय झटपट असतील पण योग्य असतील याची खात्री देता येत नाही. यातून निर्माण होणारी गतिमानता हायपर ट्रेड जन्मास घालते व त्यातून संपूर्ण जागतिक भांडवल बाजार अस्थिर होण्याचा, दिवाळखोरीकडे जाण्याचा धोका निर्माण करते.
नियमन -धोरण आवश्यक
कृत्रिम बुद्धिमता व जनरेटीव ए. आय. यांचा वापर सर्व गुंतवणूक संस्था व गुंतवणूकदार करीत असून नाणेनिधी (आयएमएफ)च्या निरीक्षणानुसार भविष्यकालीन भांडवल बाजार अधिक कार्यक्षम व अधिक अस्थिर होणार आहे. यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावी नियमनाची आवश्यकता निर्माण होते. यंत्रभाषा (श्aम्प्ग्हा थ्aहुल्agा) सखोल अध्ययन (आज् थहग्हु) यापुढे आता स्वनिर्णय घेणारी व वेगाने त्याची अंमलबजावणी करणारी कार्यप्रणाली विकसित होत असून अशा स्थितीत सर्कीट ब्रेकर, मार्जिन ठरवणे अधिक आव्हानात्मक होत आहे. ए. आय. चा वापर जोखीम व्यवस्थापन अधिक प्रभावी होणे, बाजारात तरलता वाढणे हे शक्य असल्याने त्याचे सकारात्मक परिणाम भांडवल बाजारात दिसू शकतात. जर तंत्रप्रबळ संस्था मक्तेदारी माध्यमातून ए. आय. चा वापर बाजार नियंत्रणास करणे, फसव्या मोठ्या ऑर्डर नोंदवून बाजार दिशा बदलणे, संगनमत यंत्रस्तरावर ए. आय. च्या माध्यमातून करणे या अनिष्ट धोकादायक प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा ए. आय.चा वापर प्रभावीपणे नियमन संस्थांना करावे लागेल. ए. आय. बाजारपेठ 2028 पर्यंत 40 टक्क्याने वाढणार असून त्याची मूल्यवर्धी 1.29 ट्रिलियन डॉलर होणार असल्याचा अंदाज असून यामध्ये भारतीय तंत्र संस्था, सॉफ्टवेअर कंपन्या मोठा वाटा उचलू शकतात. भांडवल बाजाराचा चेहरा, रचना व खोली ए. आय. च्या माध्यमातून येत्या 5 वर्षात मोठ्या परिवर्तनाची नांदी दर्शवत आहे.
प्रा. विजय ककडे








