तळेरे : प्रतिनिधी
सर्पमित्र म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या तसेच जीवंत सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्याचे काम निस्वार्थीपणे करणारे राजू वायंगणकर, मारुती वळंजू, अक्षय मेस्त्री आणि राजेश भोगले तसेच मनोज भांबुरे या पाच सर्प मित्रांचा सोमवारी श्री गांगेश्वर मंदिरामध्ये नागपंचमीचे औचित्य साधून निसर्ग मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा प्रत्येकी एक झाड भेट देऊन सत्कार करण्यात आला.
विविध प्रकारचे साप हे शेतकऱ्यांचे तसेच आपल्या सर्वांचे शत्रू नसून मित्र आहेत.त्यांची हत्या न करता त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले तर त्यांची संख्या वाढण्यास मदतच होईल.त्यासाठी त्यांना सर्पमित्रांकडून पकडण्यात यावेत.तसेच सापांविषयी गैरसमज दूर व्हावेत.यासाठी तळेरे पंचक्रोशीत सर्पमित्र म्हणून उत्तम कामगिरी करीत आहेत.त्या सर्व सर्प मित्रांचा नागपंचमीचे औचित्य साधून निसर्ग मित्र परिवार या पर्यावरण प्रेमी संस्थेच्या वतीने राजू वायंगणकर, मारुती वळंजू, अक्षय मेस्त्री, राजेश भोगले तसेच मनोज भांबुरे या पाच सर्प मित्रांचा सोमवारी श्री गांगेश्वर मंदिरामध्ये त्यांचा प्रत्येकी एक झाड भेट देऊन सत्कार करण्यात आला.तसेच त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर,सचिव राजेश जाधव,निलेश तळेकर,निलेश सोरप,श्री गांगेश्वर नाट्य मंडळाचे अध्यक्ष आप्पा मेस्त्री,आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील कल्याणकर,बाजारपेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन पिसे,दळवी महाविद्यालयाचे प्रा.प्रशांत हटकर,मोहन खानविलकर,सागर डंबे,सत्यवान चव्हाण,श्री.भोगले तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत व प्रस्तावित राजेश जाधव यांनी केले.









