सांगली :
करजगी प्रकरणातील आरोपीवर यापूर्वी पोक्सोचा गुन्हा दाखल असल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. खून प्रकरणाचा बारकाईने तपास करुन संशयितास अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येवून खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी विनंती न्यायालयास करण्यात येणार आहे, असे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.
घुगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यातील संशयित पांडुरंग सोमलिंग कळ्ळी सध्या आईसमवेत राहतो. वीस वर्षापूर्वी संशयित पत्नी त्यापासून विभक्त झाली आहे.2016 साली त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल होता. मात्र त्यातून त्याची तीन वर्षानंतर निर्दोष मुक्तता झाली होती. मुलीच्या घरी पोलीस दाखल झाल्यानंतर कळ्ळीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरातील एका लोखंडी पेटीत पोत्यात घातलेला बलिकेचा मृतदेह आढळून आला. यानंतर संशयित कळ्ळी यास अटक करुन त्याच्यावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तातडीने ग्रामस्थांची बैठक घेत गावात शांतता पाळण्याचे आा†ण कायदा हातात घेवू नये असे आवाहन करण्यात आले. सोशल मिडियावर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मनोधैर्य योजनेतून पिडीत मुलीच्या कुटुंबांना मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.संशयितास अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी तसेच खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याची ग्वाही घुगे यांनी दिली.








