दलित संघटनेतर्फे जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पंडित ओगले यांच्यावर दाखल करण्यात आलेला अॅट्रॉसिटी गुन्हा त्वरित मागे घ्यावा, या मागणीसाठी खानापूर तालुका दलित संघटनेच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले. जिल्हा पोलीसप्रमुख संजीव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खानापूर नगरपंचायतीसमोर आंदोलन करत बसलेले जास्तीत जास्त कर्मचारी दलित समाजाचे असून, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. म्हणून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंडित ओगले गेले होते. याचाच राग मनात धरून नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी पंडित ओगले यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे याची आपण सखोल चौकशी करून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा ताबडतोब मागे घेण्यात यावा, असे म्हटले आहे. यावेळी अॅड. आकाश अथणीकर, पुट्या हावणूर, लोकेश कलबुर्गी, सागर अष्टेकर, प्रकाश पाटील, दिलीप सोनटक्के, दिलीप पोळ, किरण अष्टेकर, राजू कलाम, दत्ता वंजारे यांच्यासह खानापूर तालुका दलित संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते









