49 वर्षीय आरोपीला अटक :
वृत्तसंस्था/ कन्नूर
केरळच्या कन्नूरमध्ये मद्यधुंद अवस्थेत 49 वर्षीय इसमाने रेल्वेमार्गावरच कार चालविली आहे. या आरोपाप्रकरणी संबंधित इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. कन्नूर येथील रहिवासी जयप्रकाशन यांना अटक करण्यात आली आहे. जयप्रकाशन यांनी 18 जुलै रोजी शहरातील एका रेल्वेमार्गावर कार चालविली होती.
रेल्वेमार्गावर कार चालविताना जयप्रकाशन हे मद्यधुंद अवस्थेत होते. रेल्वेमार्गालाच रस्ता समजून त्यांनी हा प्रकार केला होता. रेल्वेमार्गावर काही मीटरपर्यत पुढे सरकल्यावर कार बंद पडली होती. या घटनेनंतर तत्काळ रेल्वे गेटकीपर आणि स्थानिक रहिवाशांनी पोलीस तसेच नजीकच्या रेल्वेस्थानकाला कळविले होते. जयप्रकाशन यांना जामीन मिळाला असला तरीही त्यांची कार जप्त करण्यात आली आहे.









