अलारवाड ब्रिजजवळ घटना : पाचजण किरकोळ जखमी
बेळगाव ; च् ाालकाचा ताबा सुटून संरक्षक कठड्याला आदळून कार पुलावरून खाली कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी अलारवाड ब्रिजजवळ घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा पोहोचली नाही. धारवाडहून बेळगावला येणारी कार चालकाचा ताबा सुटून अलारवाड ब्रिजवरून खाली कोसळली. या कारमध्ये पाचजण होते. ते किरकोळ जखमी झाले असून केवळ सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.









