रिदम, नज वेलनेस, अवेडात हिस्सेदारी : ग्राहकांचा विश्वास प्राप्त
नवी दिल्ली
ब्युटी ब्रँड अर्थ रिदममध्ये नायका कंपनीने अलीकडेच 18 टक्के हिस्सेदारी खरेदी केली असल्याचे सांगितले जात आहे. सदरच्या हिस्सेदारीसाठी कंपनीने 41.65 कोटी रुपये मोजले आहेत, असे समजते. सदरचा खरेदीचा व्यवहार 31 मे 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता सांगितली जात आहे.
याखेरीज नायकाने दुसरीकडे 3.6 कोटी रुपयांमध्ये नज वेलनेसमध्ये 60 टक्के इतका वाटा खरेदी केल्याचीही माहिती दिली आहे. याव्यतिरीक्त कॉस्मॅटिक उत्पादनांच्या क्षेत्रातही नायका प्रवेश करत आहे. यासोबत हेअर केयरसंबंधीत जागतिक स्तरावर लोकप्रिय अवेडासोबतही अलीकडेच करार करण्यात आला आहे.
कंपनीचे इ-कॉमर्स ब्युटी विभागाचे सीईओ अंचित नायर म्हणाले, विविध ब्रँडसोबतची केलेली हिस्सेदारी ही नायका कंपनीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी असेल. कंपनीने आपला व्यवहार नेहमीच पारदर्शक ठेवला असून आजवर कंपनीने उत्तम आणि प्रभावी उत्पादने सादर करुन ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय. यायोगे आम्हाला येत्या काळात अधिकाधिक विकास साध्य करण्यासाठी योग्य ती शक्ती मिळणार आहे.









