वार्ताहर /बाळेकुंद्री
सौंदत्ती तालुक्यातील हंचनाळ गावात बुधवारी रस्त्याच्या मधोमध राज्य परिवहनची बस बंद पडल्याने स्त्राr योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या चक्क महिलांनीच बसमधून उतरून बस ढकलून सुरू केल्याची घटना घडली. राज्य परिवहनची बस सौंदत्ती-नवलगुंद मार्गावरून धावत असताना अचानक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बस हंचनाळ गावातच थांबली. यावेळी चालकाने स्टार्टरमध्ये बिघाड झाली आहे. त्यामुळे बस पुढे जायची असेल तर तुम्ही खाली उतरून बस ढकलली पाहिजे असे सांगितले. यावेळी या बसेत महिलांचा भरणा अधिक असल्याने खाली उतरलेल्या महिलांनी बस थोडे अंतर ढकलून बस पुन्हा सुरू केली. यावेळी स्थानिक एकाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रिकॉर्ड करून सोशल मिडियावर शेअर केला. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक एसटी बसेस जुन्या झाल्याने नादुरस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. जुन्या झाल्याने त्यांना स्टार्टरच लवकर लागत नाही. त्यातच थंडीच्या दिवसात तर अनेक बसेसना ती अडचण येते. त्यामुळे बस ढकलून चालू करण्याशिवाय पर्यायच उरत नाही. तरी प्रवाशांनी चांगली सेवा द्यावी अशी प्रवाशांची मागणी होत आहे.









