वार्ताहर/पाली
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज गावाजवळ कशेळी पुलानजीकच्या वळणावर रात्री १.३० वा. च्या दरम्यान रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजुपट्टीवर कलंडून अपघात झाला. या अपघाताची नोंद पाली पोलीस दूरक्षेत्रात करण्यात आली आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज गावानजीकच्या कशेळी पुलाच्या वळणावर रात्री १.३० च्या दरम्यान रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएच-१४- बीटी-२२२० घेऊन चालक दौलत विजयसिंग खाडे आला असता त्याचे कशेळी पुलाच्या वळणावर बसवरील नियंत्रण सुटून बस कलंडून अपघात झाला आहे.
या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्र येथे करण्यात आली आहे. अधिक तपास पाली पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष कांबळे, पोलिस नाईक राकेश तटकरी हे अधित तपास करत आहेत.









