सेन्सेक्स 150 तर निफ्टी 62 अंकांनी वधारला
मुंबई
भारतीय भांडवली बाजार चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी चढउतारासोबत सावरण्यात यशस्वी झाला आहे. कारण मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत झाले होते. परंतु बुधवारी मात्र तेजीने बाजारात काहीसा उत्साह राहिला होता. यावेळी सेन्सेक्स 150 तर निफ्टी 62 अंकांनी तेजीत राहिले होते.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बुधवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 149.31 अंकांसोबत 0.23 टक्क्यांच्या मदतीने निर्देशांक 65,995.81 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 61.70 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 0.32 सोबत 19,632.55 वर बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांमध्ये निफ्टीत डॉक्टर रे•ाrज लॅबचे समभाग हे 3.92 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. यासोबत जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग हे 3.20 टक्क्यांनी वधारले आहेत.
काही क्षेत्रांची कामगिरी सकारात्मक
भारतीय बाजारात मुख्य क्षेत्रांपैकी धातूचा निर्देशांक 2.3 टक्क्यांनी वधारला असून यासोबतच ऑईल अॅण्ड गॅस निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारला. तर एफएमसीजी, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर हे प्रत्येकी 0.5 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह रियल इस्टेट 1.3 टक्क्यांनी प्रभावीत झाला. तर बँक क्षेत्रात 0.2 टक्क्यांनी घसरण झाली. बीएसई मिडकॅप 0.4 टक्क्यांनी तर स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.5 टक्क्यांसह तेजीत राहिला आहे.
सेन्सेक्समध्ये जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग हे 2.86 टक्क्यांनी वधारले आहेत. तर टाटा मोर्ट्स 2.57, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभाग 1.26 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. यासह रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो, सनफार्मा, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांचे समभाग हे तेजीत राहिले आहेत. बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड कॉर्प, एशियन पेन्ट्स, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएस, यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले.









