सेन्सेक्स 143 अंकांनी वधारला : जागतिक पातळीवर संमिश्र संकेत
वृत्तसंस्था/मुंबई
जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजार वधारला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांच्या तेजीमुळे प्रमुख बेंचमार्क निर्देशांक निफ्टी50 आणि सेन्सेक्स सलग सहाव्या व्यापार सत्रात वधारले. तसेच, फार्मा आणि रिअल्टी समभागांमध्ये खरेदीने बाजाराला बळ दिले. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मध्ये सुधारणा, रशिया-युक्रेन चर्चेतील प्रगती आणि भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे यांचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 143 अंकांनी वधारले, तर निफ्टीही तेजीत राहिला होता.
दिवसअखेर सेन्सेक्स 142.87 अंकांनी वधारुन निर्देशांक 82,000.71 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 33.20 अंकांच्या मदतीने निर्देशांक 25,083.75 वर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँक हे दोन्ही शेअर्स सुमारे 1 टक्क्यांनी वाढून आघाडीवर होते. गुरुवारी या दोन्ही शेअर्सनी सेन्सेक्समध्ये 156 अंकांची भर घातली, ज्यामुळे सेन्सेक्स तेजीसह बंद झाले. याशिवाय, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि लार्सन अँड टुब्रो सारख्या कंपन्यांचे शेअर्सही वाढले. दुसरीकडे, इटर्नल आणि पॉवरग्रिड कॉर्पोरेशनचे शेअर्स सुमारे 1.5 टक्क्यांनी घसरले. एनटीपीसी, अदानी पोर्ट्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हर शेअर्सही घसरले. निफ्टी मिडकॅप50 0.5 टक्क्यांनी घसरून बंद झाला तर स्मॉलकॅप 50 0.4 टक्क्यांनी घसरला.
जागतिक बाजारपेठेतून कोणते संकेत
आशियाई बाजारांची सुरुवात संमिश्र होती. एस अॅण्ड पी 500 निर्देशांकाच्या चार दिवसांच्या घसरणीबद्दल गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली. जपानचा निक्केई 225 निर्देशांक 0.3 टक्के आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 0.07 टक्के खाली होता.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- बजाज फिनसर्व्ह 1979
- आयसीआयसीआय 1445
- बजाज फायनान्स 895
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1424
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3616
- भारत इले. 374
- टायटन 3608
- मारुती सुझुकी 14261
- सनफार्मा 1639
- भारती एअरटेल 1930
- टीसीएस 3101
- एचडीएफसी बँक 1990
- एशियन पेन्टस 2571
- इन्फोसिस 1496
- सिप्ला 1593
- कमिन्स 3890
- मॅक्स हेल्थकेअर 1249
- टीव्हीएस मोटर 2379
- ल्यूपिन 1966
- आयशर मोटर्स 5968
- बीपीसीएल 320
समभाग घसरलेल्या कंपन्या
- पॉवरग्रिड कॉर्प 284
- इटर्नल 321
- हिंदुस्थान युनि 2639
- अदानी पोर्ट 1357
- एनटीपीसी 338
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 3373
- टाटा मोटर्स 685
- स्टेट बँक 825
- टाटा स्टील 161
- एचसीएल टेक 1492
- अॅक्सिस बँक 1077
- टेक महिंद्रा 1521
- अल्ट्राटेक सिमेंट 12850
- आयटीसी 405
- कोटक महिंद्रा 2018
- सुझलॉन एनर्जी 58
- ब्रिटानिया 5603
- मॅरिको 739
- बजाज ऑटो 8685
- जिओ फायनान्स 323
- बँक ऑफ बडोदा 243









