सेन्सेक्स 284 अंकांनी प्रभावीत : निफ्टी 85.60 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील अखेर दोन दिवसांच्या तेजीला चालू आठवड्यातील चौथ्या दिवशी गुरुवारी नफा वसुलीमुळे पूर्ण विराम मिळाला आहे. यामध्ये बीएसईमधील 30 समभागांच्या कामगिरीमुळे बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 284.26 अंकांनी प्रभावीत झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातही घसरणीचा कल राहिला आहे. यामध्ये इंडिया सिमेंट्सचे समभाग हे 6 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर गुरुवारी 284.26 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 63,238.89 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 85.60 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 18,771.25 वर बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सचे समभाग 2.34 टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाले. यासोबतच टाटा मोर्ट्स 2.05 टक्के, एशियन पेन्ट्स 1.98, पॉवरग्रिड कॉर्प 1.67 आणि एनटीपीसीचे समभाग 1.47 टक्क्यांनी बंद झाले. यासह एनटीपीसी, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट आणि इंडसइंड बँक यांचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 1 ते 1 टक्क्यांनी नुकसानीत राहिले
या कंपन्यांचे समभाग चमकले
लार्सन अॅण्ड टुब्रोचे समभाग हे 0.95 टक्क्यांनी वधारले आहेत. यामध्ये टाटा स्टील 0.73, एचडीएफसी 0.62 आणि भारती एअरटेल 0.55 आणि एचडीएफसी बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि टायटनचे समभाग वधारुन बंद झाले.
नफा वसुलीचा प्रभाव
भारतीय बाजारात गुरुवारी नफा वसुलीचा कल राहिल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार राहिले होते. यामुळे निफ्टी 18,887.60 च्या उच्चांकावर पोहोचला होता. तर सेन्सेक्सही प्रारंभीच्या काळात 63,601.71 वर नवा विक्रम नोंदवत कार्यरत राहिल्याचे दिसून आले होते. परंतु दुपारनंतर मात्र हा टप्पा कायम राहिला नाही. गुरुवारी पीएसयू बँक आणि पॉवर या क्षेत्रांशी संबंधीत निर्देशांक 1 – 1 टक्क्यांनी घसरणीत राहिला आहे. यावेळी अन्य क्षेत्रांमध्ये ऑईल अॅण्ड गॅस, धातू, एफएमसीजी, औषध आणि आयटी यांचे समभाग हे 0.5 ते 0.5 टक्क्यांनी नुकसानीत राहिल्याची नोंद केली आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- लार्सन अॅण्ड टुब्रो 2416
- टाटा स्टील 111
- भारती एअरटेल 843
- एचडीएफसी 2715
- एचडीएफसी बँक 1643
- महिंद्रा अॅण्ड माहिद्रा 1379
- टायटन 2977
- आयसीआयसीआय 925
- आयटीसी 447
- टेक महिंद्रा 1120
- बीपीसीएल 374
- फेडरल बँक 123
- अशोक लेलँड 164
- हिरोमोटो 2824
समभाग घसरलेल्या कंपन्या
- बजाज फायनान्स 7033
- टाटा मोर्ट्स 569
- एशियन पेन्ट्स 3249
- पॉवरग्रिड कॉर्प 253
- एनटीपीसी 184
- इन्फोसिस 1282
- नेस्ले 22561
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2535
- अल्ट्राटेक सिमेंट 8153
- इंडसइंड बँक 1273
- विप्रो 382
- हिंदुस्थान युनि 2655
- बजाज फिनसर्व्ह 1508
- एचसीएल टेक 1162
- स्टेट बँक 563
- कोटक महिंद्रा 1835
- टीसीएस 3238
- मारुती सुझुकी 9409
- अॅक्सिस बँक 963
- सनफार्मा 991
- इंडियन हॉटेल्स 383
- सिमेन्स 3695
- सीजी कझ्युमर 286
- पीआय इंडस्ट्रीज 3863
- आयआरसीटीसी 644
- ल्यूपिन 851
- गेल 104









