कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी पंचवार्षिक निवडणूक ( Rajaram Cooperative Sugar Factory Five Year Election ) जाहीर झाली आहे. 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार असून 25 एप्रिल ला मतमोजणी होणार आहे. राजाराम कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्याने कोल्हापुरातील महाडिक गट आणि पाटील गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. जवळपास चौदा हजार सभासद असल्याने हातकलंगले तालुक्यात मोठा सभासद वर्ग आहे. राजाराम कारखान्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 20 मार्च ते 27 मार्च या कालावधीत होणार आहे. अर्ज छाननी 28 मार्च रोजी होणार आहे. तर 19 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत अर्ज माघार घेण्याचा दिवस आहे. मतदान प्रक्रिया ही 23 एप्रिलला होणार असून मतमोजणी 25 एप्रिल ला होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









