बेकिनकेरे येथील घटनेने शेतकऱ्यांमध्ये कुतुहल
बेळगाव : बेकिनकेरे येथे नुकत्याच विलेल्या एका म्हशींने पाच पायांच्या रेडकाला जन्म दिला आहे. या घटनेने आश्चर्य व्यक्त होत आहे आणि एक चर्चेचा विषय बनला आहे. रावजी सावंत असे म्हैस मालकाचे नाव आहे. सहसा म्हशी चार पायांच्या रेडकांना जन्म देते. मात्र या म्हशीने पाच पाय असलेल्या रेडकाला जन्म दिला आहे. या घटनेमुळे पशुपालकांची गर्दी होत आहे. विशेषत: म्हैस आणि रेडकू देखील सुखरुप आहेत. रावजी सावंत यांच्या गोठ्यात पाच, सहा जनावरे आहेत. यापैकी एका म्हशीने पाच पाय असलेल्या रेडकाला जन्म दिला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने कुतुहल वाटू लागले आहे. जन्म दिलेल्या म्हशीवर आणि रेडकावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचार केले आहेत.









