श्रीरामनवमी दिवशी कामकाजाला सुट्टी
पणजी : मार्च महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील एक दिवस कमी करण्यात आला असून आता ते पाच दिवसांऐवजी चार दिवसच होणार आहे. तशी अधिसूचना गोवा विधिमंडळ सचिवांनी जारी केली आहे. दि. 27 मार्च ते 31 मार्च असे एकूण 5 दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यापूर्वी निश्चित करण्यात आले होते. ते निश्चित करताना 30 मार्च रोजी असलेली रामनवमी कोणाच्या लक्षात आलेली नव्हती. सभापती रमेश तवडकर यांच्या ती लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा कऊन 30 मार्च रोजी विधानसभा कामकाज न करण्याचा निर्णय घेतला आणि तसे विधिमंडळ सचिवालयास कळवण्यात आले. त्यानुसार आता विधानसभा कामकाज 27, 28, 29 व 31 मार्च असे चार दिवस होणार आहे. 30 मार्च रोजी विधानसभा अधिवेशनास सुट्टी देण्यात आली आहे. त्या दिवशीचे निश्चित केलेले कामकाज इतर चार दिवसात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अर्थसंकल्पासाठी जनतेने सूचना, मागण्या सादर कराव्या : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
राज्य सरकारच्या 2023 – 24 च्या अर्थसंकल्पासाठी सरकारने जनतेकडून सूचना, तक्रारी व आपापले म्हणणे मांडण्याचे आवाहन केले आहे. जनतेच्या इच्छा, आकांक्षा, सूचनांना अर्थसंकल्पात स्थान मिळाले पाहिजे आणि तो जनताभिमूख झाला पाहिजे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. विद्यार्थी, उद्योजक व विविध क्षेत्रातील लोकांनी अर्थसंकल्पाबाबतच्या ज्या काही भावना किंवा मागण्या असतील त्या सरकारसमोर सादर कराव्यात, त्यावर गांभिर्याने विचार कऊन योग्य सूचना, मागण्यांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प व्हावा म्हणून दरवर्षी जनतेकडून सूचना मागवण्यात येतात. यावर्षीही तीच प्रक्रिया सरकार करणार असून येत्या 15 मार्चपर्यंत गोवा सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्थसंकल्पाबाबत विचार खुलेपणाने मांडावेत. त्याची दखल घेतली जाईल, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले आहे. www.gददहत्ग्हा.gदन्.ग्ह येथे लॉग इन कऊन पुढे बजेट 23-24 वर जाऊन तेथे सूचना सादर कराव्यात, असे सूचित केले आहे.









