द ब्रूटलिस्ट हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कारावर स्वत:चा ठसा उमटविल्यावर युनिव्हर्सल पिक्चर्स आता वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीकडून निर्मित हा चित्रपट चालू महिन्यात भारतात प्रदर्शित करण्यात आला आहे. ब्रॅडी कॉर्बेटकडून दिग्दर्शित या चित्रपटात एड्रियन ब्रॉडी, फेलिसिटी जोन्स, गाइ पीयर्स, जो अल्विन, राफे पॅसिडी, स्टेसी मार्टिन, इसाक डी बँकोले आणि एलेसेंड्रो निवोला यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. लास्जलो टोथ या व्यक्तिरेखेची ही कहाणी असून जो एक दूरदर्शी वास्तूकार आहे, जो युद्धानंतर युरोपमधून पळून जातो आणि स्वत:चे जीवन, काम आणि पत्नी एर्जबेट (फेलिसिटी जोन्स)सोबत स्वत:चा विवाह टिकविण्यासाठी अमेरिकेत येतो.
पेंसिल्वेनियात स्थायिक झाल्यावर लास्जलोची प्रतिभा हॅरिसन ली वॅन ब्यूरन एक धनी आणि प्रभावी उद्योगपतीच्या नजरेत येतो. या चित्रपटाला अलिकडेच सर्वश्रेष्ठ मोशन पिक्चर-ड्रामा, सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक आणि मोशन पिक्चर ड्रामामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर दिग्दर्शक ब्रॅडी कॉर्बेटला प्रतिष्ठित सिल्वर लॉयन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.









