सावंतवाडी / प्रतिनिधी
The broken world of that family will rebuild social commitment!
22 एप्रिल रोजी सावंतवाडी बाहेरचा वाडा येथे पहाटे एक वाजता एका गरीब कुटुंबाच्या झोपडीला एका माथेफिरूने आग लावली सुदैवाने कोण नसल्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला कारण दोन दिवसात पूर्वी सदर कुटुंब आपल्या लहान दोन मुलांसोबत गावी गेले होते. काही कारण नसताना एका माथेफिरूने त्यांच्या झोपेला आग लावून त्यांचा सर्व संसार जळून खात केला. संसारामध्ये नवऱ्याला आधार व्हावा म्हणून पत्नीने कर्ज काढून शिलाई मशीन घेतली होती लग्न सराई असल्याकारणाने लोकांच्या साड्या ,ब्लाऊज शिवणीचं काम सुरू होतं. लोकांच्या साड्या व ब्लाऊज कपाटामध्ये तयार करून ठेवल्या होत्या तर कपाटामध्ये ठेवल्या होत्या तसेच महत्त्वाचे कागदपत्र व काही चांदीच्या वस्तूही ठेवल्या होत्या तर पहिल्यांदाच खूप वर्षानंतर घरामध्ये मनोरंजन म्हणून गुढीपाडव्याला हप्त्यावर टीव्ही व कपाट घेतलं होतं त्या आधीच्या भडक्यामध्ये भांड्याकुंड्यांसहित सर्व काही जळून खाक झाले.
चुलही विजली संसार उघड्यावर पडला अश्रू अनावर झालेल्या या परिवाराची कहाणी ऐकून सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा त्यांचा संसार उभारणी करिता त्यांना मदतीचा हात दिला. एका बाजूला कर्जाचा डोंगर तर दुसऱ्या बाजूला अन्न शिजवायला साधन नाही मुलं एक दीड वर्षाची मुलं उपाशी आहेत तर ते दांपत्य कोणीतरी आपल्या मदतीला धावून येईल ह्या आशेने पाहत असतानाच सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव,संजय पेडणेकर, समीरा खालील, प्रा.सतीश बागवे, प्रा शैलेश नाईक, शरद पेडणेकर प्रसाद कोदे श्याम हळदणकर एडवोकेट अशोक पेडणेकर, शेखर सुभेदार, हेलन निबरे, यांनी संकटात असलेल्या कुटुंबाची भेट घेतली व त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला आपल्याला सुद्धा एक विनंती आहे शक्य असेल तर त्यांचा संकटात असलेल्या या कुटुंबाचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी आपणही वस्तू स्वरूपात हातभार लावावा यासाठी सामाजिक बांधिलकी सावंतवाडी आपल्याला विनम्र आवाहन करत आहे. संपर्कासाठी रवी जाधव 9405264027









