बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर सीबीएसई राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी 1 रौप्य आणि 2 कांस्यपदके अशी पदकांची कमाई केली.
गुरुग्राम हरियाणा येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धमध्ये संपूर्ण भारतातून 1200 च्या वर स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत स्पीड स्केटिंग आर्य कदम 1 रौप्य, अवनीश कामन्नवर 2 कांस्यपदके पटकाविली. या स्पर्धकांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकात हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, विशाल वेसणे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले आहे. मुख्याध्यापिका सरला कोसराजू, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम यांचे प्रोत्साहन लाभले आहे.









