प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहराला लागून असलेल्या कुप्पटगिरी गावाला जाणारा जुन्या रस्त्यावरील पूल खचल्याने या पुलावरून होणारी रहदारी बंद झाली आहे. यामुळे कुप्पटगिरी गावकऱयांना जवळचा रस्ता बंद झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. बेळगाव-खानापूर महामार्ग तयार झाल्यामुळे या जुन्या रस्त्यावरून वाहतूक वाढली आहे. यासाठी हा पूल तात्काळ दुरुस्त होणे गरजेचे आहे. या पुलाची नुकताच महालक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष विठ्ठल हलगेकर, ग्रा. पं. सदस्य भाऊ पाटील, कृषी पत्तीनचे संचालक शंकर पाटील, हणमंत पाटील, श्रीपती पाटील, केदारी पाटील, नारायण पाटील, परशराम पाटील यांनी पाहणी करून जिल्हा पंचायतीच्या कार्यकारी अधिकारी एस. के. पाटील यांना तात्काळ हा पूल दुरुस्त करावा, अशा सूचना यावेळी हलगेकर यांनी केल्या. याबाबत आपण योग्य क्रम घेऊ, असे आश्वासन पाटील यांनी दिले.









