सावंतवाडी / प्रतिनिधी
झाड वीज वाहिन्यांवर कोसळल्यास हानीची शक्यता
सावंतवाडी शहरातील माठेवाडा काझी दिंडी येथील जुने आंब्याचे झाड वीज वाहिन्यांवर आल्याने धोकादायक बनले आहे. पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडणे तोडणे गरजेचे आहे, सध्या सावंतवाडी शहरांमध्ये वीज वितरणचे वाहिन्यांवरील फांद्या तोडण्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. पावसाळ्यात हे झाड वीज वाहिन्यांवर कोसळल्यास वीज वितरणची मोठी हानी होऊ शकते. तसेच हा रस्ता रहदारीचा देखील असल्याने बऱ्याच लोकांची ये-जा या रस्त्याने होत असते. एखाद्यावेळी झाड कोसळल्यास जीवितहानी देखील होऊ शकते. त्या दृष्टीने नगरपालिका आणि वीज वितरणने पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर झाडाच्या फांद्या तोडाव्यात अशी मागणी तेथील नागरिकांमधून होत आहे.









