प्रतिनिधी/ बेळगाव
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र यावेत आणि बेळगावच्या मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी एका युवकाने विठुरायाकडे केली आहे. पुणे येथे वारीमध्ये सहभागी होत या युवकाने सीमाप्रश्नाच्या लढ्याची जागृती केली.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाचे उपाध्यक्ष व पिरनवाडी येथील युवा कार्यकर्ते नारायण मुचंडीकर हे वारीमध्ये सहभागी झाले आहेत. मराठी माणसाच्या हक्कासाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी इच्छा त्यांनी फलकाद्वारे व्यक्त केली. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्रासोबत सीमाभागालाही न्याय मिळवून द्या, ही बेळगावकरांची मागणी त्यांनी विठुरायासमोर मांडली. पुण्यातील अनेक संघ-संस्थांनी त्यांच्या या मागणीचे कौतुक केले.









