सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी खासकीलवाडा येथील विठ्ठल उर्फ अवि बाळकृष्ण परब , (वय 27 ) या युवकाचा मृतदेह मोती तलावात आढळून आला. तो अविवाहित होता. काल सकाळी घरातून निघालेला विठ्ठल घरी परतलाच नाही. मात्र , आज सकाळी मोती तलावाच्या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या व्यक्तींना मोती तलावाच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. लागलीच नागरिकांनी पालिका व पोलीस स्टेशनला कळवले .त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मोती तलावात बोटिंगद्वारे सदरचा मृतदेह बाहेर काढला. सदरच्या मृतदेहाची ओळख युवकाचे वडील बाळकृष्ण परब यांना पटली त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. यावेळी राजूधार पवार ,सुधन आरेकर आधी घटनास्थळी दाखल होते. त्याला दारूचे व्यसन होते. त्या व्यसनामुळे त्याचा मोती तलावात तोल जाऊन पडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









