वार्ताहर /किणये
कुसमळीजवळील मलप्रभा नदीतील रेडेकोंड नजीकच्या एका डोहात रा†ववारी दुपारी पोहताना बहाद्दरवाडी गावचा तऊण बुडाला होता. राहुल मनोहर मुळीक (वय 29) असे त्या दुर्दैवी तऊणाचे नाव होते. नदीत बुडाल्यानंतर ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी शोधमोहीम हाती घेतली. सोमवारी तब्बल 23 तासानंतर राहुलचा मृतदेह सापडला. महाशिवरात्रीनिमित्त बहाद्दरवाडी गावातील नागरिक कुसमळी जवळच्या मलप्रभा नदीवरील रेडेकोंड येथे यात्रेसाठी रविवारी गेले होते. नदीतील रेडेकोंडच्या वरच्या बाजूतील एका डोहात राहुल पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.









