अभिनेते शेखर कपूर यांच्यासह पाच जणांचा समावेश
पणजी : गोव्यात कायमस्वऊपी केंद्र असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला असून त्या महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळ जाहीर करण्यात आले आहे. नामवंत अभिनेते शेखर कपूर हे त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. आतापर्यंत महोत्सवासाठी 100 हून अधिक देशांचे मिळून 300 च्या आसपास चित्रपट प्रवेशिका आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यापैकी निवडक चित्रपटच महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. जोसेफ लुईस अल्कायन, जेरॉम पेलार्ड, कॅथरीन दुस्सार्ट, हेलन लिक हे परीक्षक मंडळाचे इतर सदस्य आहेत. पाच जणांचे हे परीक्षक मंडळ महोत्सवात उपस्थित राहून स्पर्धेतील चित्रपटांचे परीक्षण कऊन निकाल देणार असल्याचे सांगण्यात आले. या महोत्सवाला आता अवघे 15 दिवस बाकी असून त्याची एकंदरीत तयारी सुऊ झाल्याचे चित्र दिसत आहे. चालू नोव्हेंबरमध्ये 20 ते 28 तारखेच्या या कालावधीत एकुण 9 दिवस हा महोत्सव नेहमीप्रमाणे राजधानी पणजीत रंगणार आहे. महोत्सवाचा उद्घाटन समारोप सोहळा कुठे करायचा आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे कोण येणार याबाबत अद्याप काही ठरले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. महोत्सवाचे काऊंटडाऊन सुऊ झाले असून मुख्य केंद्र असलेल्या आयनॉक्स परिसरात विविध प्रकारची कामे चालू करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.