ऑस्ट्रेलियाच्या पूर्व न्यू साउथ वेल्समध्ये असलेले ब्ल्यू माउंटेन केवळ एक चकित करणारे दृश्य नसून भूवैज्ञानिक इतिहास, अद्वितीय वनस्पती आणि जीव तसेच समृद्ध सांस्कृतिक वारशाचा खजिना आहे. प्राचीन खडकाळ संरचनांपासून जिवंत स्थानिक समुदायांपर्यंत ब्ल्यू माउंटेन नैसर्गिक सौंदर्य अणि ऐतिहासिक महत्त्वाचे मिळतेजुळते उदाहरण असून ते दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करत असते. निळ्या पर्वतांना निळे म्हणण्यामागे खास कारण आहे. ब्ल्यू माउंटन नाव त्याच्या निळ्या धुक्यामुळे प्राप्त झाले आहे जे दूरून पाहिल्यास पर्वताला झाकून टाकते. ही अद्भूत घटना क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असलेल्या युकेलिप्टसच्या झाडांमधून निघणाऱ्या युकेलिप्टसच्या तेलाच्या छोट्या थेंबांच्या माध्यमातून सूर्यप्रकाश विखुरण्यामुळे होत असते.
हा पर्वत प्राचीन असून याची शिखरे सुमारे 470 दशलक्ष वर्षे जुनी आहेत. हा ग्रँड कॅन्यनपेक्षा सुमारे 10 पट जुना आहे. ग्रेट डिव्हायडिंग रेंजचा हिस्सा, ब्ल्यू माउंटेन एक बलुआ दगडाचा पठार असून तो जवळपास 5 कोटी वर्षांपूर्वी एका महत्त्वपूर्ण उत्थानानंतर निर्माण झाला होता. या क्षेत्रात भूतापीय साधनसंपदा असून ज्यात तप्त झरे देखील सामील आहेत. ब्ल्यू माउंटेन प्रत्यक्षात एका नॅशनल पार्कचा हिस्सा आहे. 1959 मध्ये स्थापन ब्ल्यू माउंटेन पार्क 2690 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेले असून युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ आहे. 140 किलोमीटरपेक्षा अधिक लांब पायवाटांसोबत पार्कमध्ये छोट्या सैरपासून आठवडाभरापर्यंत चालणाऱ्या ट्रेकपर्यंत सर्वकाही उपलब्ध आहे. उल्लेखनीय मार्गांमध्ये सिक्स फूट ट्रॅक, नॅशनल पास आणि ग्रँड कॅन्यन वॉक सामील आहे.
ब्ल्यू माउंटेन अनेक प्रकारच्या रोपांचा आणि प्राण्यांचा अधिवास आहे. यातील काही प्रजाती अन्यत्र आढळून येत नाहीत. येथे 150 हून अधिक अनोख्या रोपांच्या प्रजाती आढळून येतात, ज्यात थिमिया मेगालोंगेंसिस सामील असून ते 2015 मध्ये शोधण्यात आलेले एक नारिंगी फळ असून त्याचा गंध सडलेल्या माशाप्रमाणे असतो. हे क्षेत्र ईस्टर्न ब्रशटेल पोसम आणि स्पॉटेड-टेल्ड क्वोल यासारख्या प्राण्यांचे घर असून ते अन्यत्र कुठेच आढळून येत नाहीत. येथे आदिवासी हजारो वर्षांपासून राहत आहेत. गुंडुंगुरा आणि दारुग लोकांनी येथे रॉक आर्ट आणि नक्षीकाम केल्याचे दिसून येते. या लोकांच्या नव्या पिढ्या आता त्याच्या कहाण्या आणि इतिहास सांगतात. येथील रिट्रील ब्ल्यू माउंटेन आता एक लोकप्रिय पर्यटन क्षेत्र आहे. या क्षेत्रात 27 हून अधिक शहरे असून ज्यात लेउरा, वेंटवर्थ फॉल्स आणि ग्लेनब्रुक सामील आहे. यातील प्रत्येक शहरात सुंदर आणि स्थानिक संस्कृती आहे. सीनिक वर्ल्ड जगातील सर्वात मोठी रेल्वे असून त्याचा वापर 1878 मध्ये खाणकामासाठी करण्यात आला होता.