केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची राऊंतावर टीका : लोकसभेच्या 46 तर विधानसभेच्या 190 जागां जिंकणार : खारघरची घटना निसर्गाचा कोप
सांगली प्रतिनिधी
लोकसभेच्या 2024 मधील निवडणुकीत भाजपने 403 जागा जिंकण्याचे उा†द्दष्ट ठेवले आहे. राज्यातही भाजप लोकसभेच्या 46 तर विधानसभेच्या 190 जागा जिंकेल, असा दावा केंद्रीय सूक्ष्म, लघु आा†ण मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. ‘कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही’, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना त्यांनी फटकारले. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार चांगले काम करत असल्याचेही राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
केंद्रीय मंत्री राणे शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. एकसंघ व एक ा†वचाराने भाजप सर्व निवडणुकांना सामोरे जाणार आहे. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले ा†नर्णय, ा†वा†वध योजना, भाजपचे कार्य जनतेपर्यंत पोहोचा†वण्याचे काम कार्यकर्ते करणार आहेत. 2030 पर्यंत भारताला महासत्ता बना†वण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. लोकसभेला देशात 403 जागांचे उदिष्ट्या आहे. महाराष्ट्रातही भाजप लोकसभेच्या 46 तर विधानसभेच्या 190 जागा जिंकेल.
दरम्यान ा†शवसेनेत असताना संजय राऊत यांना ा†नवडून आणण्यासाठी खर्च केल्याचे व‹व्य त्यांनी भांडूपच्या सभेत केले होते. या व‹व्या†वरोधात राऊत यांनी मुलुंड न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याबाबत विचारले असता, कोण आहे संजय राऊत? मी ओळखत नाही असे सांगत भांडूपच्या सभेत मी असे बोललोच नाही असे स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाबाबत तज्ञांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. शरद पवार यांच्यामध्ये राजकीय भूकंप करण्याची ताकद उरलेली नाही असे सांगत राणे यांनी अजित पवार यांच्या राजकीय हालचालींवर भाष्य करणे टाळले. राणे म्हणाले, काही माहिन्यांपासून त्यांची भेट झालेली नाही. त्यांच्याशी फोनवऊनही संपर्क झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय चालले आहे, हे माहीत नाही. त्यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही, हे वा†रष्ठ नेते बघतील, तपासून घेतील. तेही भाजपच्या निकषात बसले पा†हजेत.
शेतीमाल निर्यातीसाठी प्रयत्नशील
सांगली जिह्यातील शेतीमाल, उपपदार्थ निर्यात व्हावे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सांगलीचा ड्रायपोर्ट, बेदाणा व विमानतळाबाबत भाजपच्या बैठकीत चर्चा झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा कऊ असेही राणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
खारघरची घटना निसर्गाचा कोप
खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरसकारावेळी झालेली दुर्घटना हा निसर्गाचा कोप आहे. त्यामुळे तेथे आलेल्या श्रीसदस्यांचे झालेले मृत्यू कोणी घडवून आणलेले नाहीत असे राणे यांनी सांगितले.
विरोधक म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे
विरोधकांकडून होणाऱ्या टीकेसंदर्भात बोलताना राणे म्हणाले, विरोधकांना नाचता येईना अंगण वाकडे असे झाले आहे. सत्ता गेल्याने हताश झाले आहेत. राज्यात पुन्हा सत्ता येणार नाही. हातात काही न राहिल्याने विरोधक टीका करत आहेत.