आंगणेवाडीच्या यात्रेनिमित्त मालवण -आंगणेवाडी रस्त्यावर भाविकांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर फाडण्यात आले आहेत. कोकणातल्या प्रसिध्द अशा अंगणेवाडी यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने कोकणात येत असतात. त्यांच्या स्वागतासाठी सर्वच राजकीय पक्ष बॅनर लावतात. काल रात्री एका अज्ञाताने भाजपचा बॅनर फाडला.आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आज होणार आहे.यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची यात्रा आज आहे.यासाठी आंगणेवाडीमधील माळरानावर भाजपने भव्य जाहीर सभा आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्ग स्थिरावतोय या टॅगलाईनवर ही जाहीर सभा भाजप घेत असून या सभेदरम्यान शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे गावकरांचे म्हणणे आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









