संत सेना रोड, शास्त्राrनगर येथील घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
घरासमोर उभी करण्यात आलेली दुचाकी अज्ञातांनी पेटविल्याची घटना संत सेना रोड, शास्त्राrनगर येथे घडली आहे. यासंबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बुधवार दि. 17 मे रोजी मध्यरात्री ही घटना घडली असून, यासंबंधी जगदीश दरवंदर यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे पाणी मारून आग विझविण्यात आली. नहून संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली असती.
केए 22, एचबी 7459 क्रमांकाची होंडा अॅक्टिव्हा जगदीश दरवंदर यांनी आपल्या घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री अज्ञातांनी ती पेटविली. शेजाऱ्यांनी वेळीच आगीची घटना पाहिली. त्यामुळे आरडाओरड करून संबंधितांना जागे करण्यात आले. पाणी मारून आग विझविण्यात आली.









