ट्रेलर लाँचला परवानगी नाकारली
वृत्तसंस्था/ कोलकाता
विवेक अग्निहोत्रीचा ‘द बंगाल फाईल्स’ हा चित्रपट लवकरच झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम शनिवारी कोलकाता येथे होणार होता. मात्र तत्पूर्वी बराच गोंधळ निर्माण झाला. ‘द बंगाल फाईल्स’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम अचानक थांबवण्यात आला. त्यानंतर विवेक अग्निहोत्री आणि त्याची पत्नी-अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी राजकीय दबावामुळे ट्रेलर लाँचसाठी परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप केला. त्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ही हुकूमशाही/फॅसिझम असून राज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचा दावा केला. यासंबंधी राज्यातील ‘राजकीय दबावा’मुळे प्रदर्शन रद्द केल्याचे आयोजकांनी त्यांना सांगितले









