मुख्याधिकाऱयांचे निर्देश
प्रतिनिधी /वाळपई
वाळपई नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर मधमाशांनी पोळे केल्यामुळे जनजीवन धोक्मयात आल्याची बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर याची गंभीर दखल वाळपई नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱयांना घेतली आहे. एक खास आदेश काढून वाळपई वीज खात्याला सदर पोळे नष्ट करण्यास सांगितले आहेत.
याबाबतची माहिती अशी, की वाळपई नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर मधमाशांनी एकूण 12 पोळय़ा केलेल्या आहेत. गेल्या सहा महिन्यापासून मधमाशा पोळे बनवत असून सुरुवातीलाच सदर पोळे नष्ट करणे गरजेचे होते. प्रशासकीय इमारती वाळपई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे मधमाशांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याकडून नागरिकांवर हल्ला होण्याची शक्मयता आहे. याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या. याची गंभीर दखल घेऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुर्याजीराव राणे यांनी एक खास आदेश आढून वाळपई वीज खात्याला मधमाशांचे पोळे नष्ट करण्यास सांगितले आहे. त्याची अंमलबजावणी शक्मय तेवढय़ा लवकर करावे असेही त्यात म्हटले आहे. मुख्याधिकारी सुर्याजीराव राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पालिकेने मधमाशांच्या पोळय़ा नष्ट करण्याचे प्रयत्न केले मात्र तज्ञ इसम न मिळाल्यामुळे नगरपालिका मधमाशीचे पोळे नष्ट करू शकली नाही. यामुळे आता वीज खात्याला ते नष्ठ करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.









