वार्ताहर /किणये
मच्छे गावातील तलावाचे सौंदर्यीकरण पुन्हा एकदा धोक्मयात आले आहे. गावातील एकमेव व मुख्य असलेल्या या तलावाचे सौंदर्यीकरण आणि दुरुस्ती दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. सध्या या तलावाच्या बाजूने झाडेझुडपे आणि केरकचरा टाकण्यात आला आहे. या तलावाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
मच्छे गावातील मुख्य तलावाचे सौंदर्यीकरण आणि दुरुस्ती दोन वर्षांपूर्वी प्यास फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली. तलावाचे काम केल्यानंतर बऱयापैकी पाणीसाठा झाला. पण सध्या आजूबाजूला कचरा टाकण्यात येत आहे व झाडेझुडपेही वाढली आहेत. याची साफसफाई नगरपंचायतीने करावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
तलावाचे सुशोभीकरण केल्यामुळे येथे नागरिक फेरफटका मारत आहेत. या तलावाचा नागरिक व शेतकऱयांनाही फायदा होणार आहे. प्रशासनाच्यावतीने पाणी अडवा पाणी जिरवा योजनेंतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो. या तलावासाठीही सरकारने पुढाकार घ्यायला हवा, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मच्छे ग्रा. पं. ला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर गावची विकासकामे रखडली आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. हा तलाव गावातील शेतकऱयांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे नगरपंचायतीने व अधिकाऱयांनी तलावाची पाहणी करून केरकचरा आणि झाडेझुडपे हटवावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.









