सातारा, प्रतिनिधी
Satara News: साताऱ्यातील शिवतीर्थावर “तरुण भारत”ने सातत्याने पाठपुरावा करून गेल्या 8 वर्षांपासून बॅनर बंदी केली .तसेच नगरपालिकेला “बॅनर लावू नये” अश्या आशयाचा फलक लावायला सांगितला आहे.
तरीही गेल्या काही दिवसंपासून इथं पुन्हा पुन्हा बॅनर लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गुरुवारी सकाळी शिवतीर्थावर पालकमंत्री शंभूराजे देसाई व त्यांचे चिरंजीव यशराज देसाई व अन्य काही कार्यकर्ते यांचे फोटो असलेला एक बॅनर लावण्यात आल्याचे निदर्शनास आला.हा बॅनर शिवतीर्थावरून हटवून योग्य त्या जागेत आणि योग्य ते शुल्क भरून लावण्याच्या सूचना यशराज देसाई यांनी केल्या.यशराज देसाई यांनी दाखवलेली समयसुचकतेचे शिवभक्तांकडून स्वागत होत आहे.
एका इडली हॉटेल उदघाटनाचा हा बॅनर तातडीने हटवण्याचा हालचाली झाल्या.पालकमंत्री यांचा फोटो आहे,मग यावरून काही पडसाद उमटतील का? असा प्रश्न निर्माण झाल्याने ही बाब चेअरमन यशराज देसाई यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी स्वतः “शिवतीर्थाचे पावित्र्य सर्वांनी राखायला हवे.हा बॅनर शिवतीर्थावरून हटवून योग्य त्या जागेत आणि योग्य ते शुल्क भरून लावण्याच्या सूचना”केल्या.
दरम्यान,यशराज देसाई यांनी दाखवलेली समयसुचकतेचे शिवभक्तांकडून स्वागत होत आहे. सेच साताऱ्यातील इतर राजकीय व व्यावसायिकांनी अगदी दोन्ही राजेंनी शिवतीर्थाचे महत्व लक्षात घेऊन बॅनर न लावण्याच्या कायमस्वरूपी सूचना आपल्या कार्यकर्त्यांना द्याव्यात,असे उघडपणे बोलले जात आहे.
Previous Articleमोदी, शहा यांच्या तालावर ईडी नाचत आहे : जयराम रमेश
Next Article हेमश्री चिटणीस ‘नेट-जेआरएफ’ साठी पात्र…









