विश्वनाथ मोरे , कसबा बीड /प्रतिनिधी
यावर्षी मान्सून पावसाने ओढ दिल्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गाच्या जीवाला घोर लागला होता. मृग नक्षत्रावर होणाऱ्या पेरण्या रोहिणी नक्षत्र आले तरी खोळंबल्या होत्या. शेतकरी राजाचे लक्ष आकाशाकडे लागून राहिले होते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस सुरू होतो म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागतीची संपूर्ण कामे पूर्ण केली होती. ही सर्व कामे करत असताना प्रसंगी कर्ज काढले व पेरणीसाठी पावसाची वाट पाहत बसावे लागले होते.
गेल्या दोन दिवसांमध्ये रिमझिम स्वरूपात मान्सून पावसाचे आगमन झाले. हळूहळू संपूर्ण कोल्हापूर जिल्हा मान्सून पावसाने व्यापला. त्यामुळे आता पेरणीच्या कामाला वेग सुरू झालेला आहे. भात पेरणी, सोयाबीन पेरणी, भुईमूग पेरणी अशा विविध रब्बी पिकांच्या पेरणीसाठी आता शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. अचानक सुरू झालेल्या मान्सून पावसामुळे आता शेतमजुरांचा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे. यावर पर्याय म्हणून सर्व शेतकरी वर्गाने एकमेकांच्या मध्ये पहिला चालू केला आहे.
एकंदरीत कसबा बीड परिसरातील पाडळी खुर्द, कोगे , महे , कसबा बीड , सावरवाडी, गणेशवाडी , शिरोली दुमाला ,सावर्डे दुमाला , व चाफोडी आदी भागांमध्ये पेरण्याची झुंबड उडाली आहे. भात सरी वरती पेरणी , कुरीची भात पेरणी,सोयाबीन पेरणी,आधी पेरण्या जोरात सुरू झालेल्या आहेत.पेरणीची कामे युद्ध पातळीवर सुरू झालेली आहेत.









