वार्ताहर/कडोली
गणरायांच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी मंगळवारी कडोली येथील परिसरात गौराईचे उत्साहात आगमन झाले. शनिवारी कडोली परिसरात सार्वजनिक गणपतीबरोबर घरगुती गणपतींचे उत्साहात स्वागत झाले. सर्वत्र गणेशभक्त आता पूजा, अर्चा कार्यात गुंतले असताना महिलांसाठीही अत्यंत प्रभावीत आणि उत्साहाला उधाण आणणारे गौराईचं आगमन तितकेच महत्त्वाचे मानले जाते. गौराईचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळपासूनच महिलांसह लहान मुलीही गौराईला सजवून आणण्याच्या तयारीत गुंतल्या होत्या. लहान मुलीं नटूनथटून गौराइ आणण्यात गुतल्या होत्या. या गौराईच्या सणामुळे गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत होते.









