दिग्दर्शिका झोया अख्तरचा आगामी चित्रपट ‘द आर्चीस’ची प्रतीक्षा चाहते आतुरतेने करत आहेत. कारण या झोयाच्या या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना, श्रीदेवीची मुलगी खूशी कपूर यासारखे अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. जिंदगी न मिलेली दोबारा, गली बॉय आणि दिल धडकने दो यासारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या झोया अख्तरने यावेळी स्टार किड्सना प्राधान्य दिले आहे. झोयाच्या या चित्रपटातील कलाकारांचे नवे छायाचित्र व्हायरल झाले आहे. यात ‘द आर्चीस’मधील सर्व कलाकार रस्त्याशेजारी उभे असून त्यांच्यामागे एक होर्डिंग असल्याचे दिसून येते. यावर द आर्चीस हा चित्रपट 100 दिवसांनी प्रदर्शित होणार असल्याचे संदेश आहे. झोयाच्या या चित्रपटात सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा, युवराज मेंदा, वेदांग रैना, अदिती डॉट आणि मिहिर आहुजा सामील आहेत. यातील बहुतांश जण अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. द आर्चीस चित्रपटावरून सुहाना खानची सर्वाधिक चर्चा होत आहे. हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
Previous Articleबेळगावच्या कलाकारांकडून श्रीलंकेत भरतनाट्याम
Next Article डी. गुकेश बनला भारतातील अव्वल बुद्धिबळपटू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









