बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यतेप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात खेळीमेळीत पार पडली. पुढील वार्षिक हंगामात आंतरशालेय, आंतर महाविद्यालय व वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा घेण्यात येणार आहे. हे एक एकमताने ठरविण्यात आले. अध्यक्षांनी संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब हे होते. हॉटेल बगीचाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीत प्रारंभिक उपस्थित सभासदांचे स्वागत संघटनेचे सचिव अमित पाटील यांनी केले. या बैठकीत गतवर्षी इंडियन फुटबॉल संघटनेच्या आदेशानुसार 13 वर्षाखालील राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धा, 14 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धा, खेलो इंडिया 13, 15 व 17 या स्पर्धा भरविण्यात आल्या. या स्पर्धेचा आढावा घेण्यात आला. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल भारतीय फुटबॉल संघटना व कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेने बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे कौतुक केले.
त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या 15 वर्षाखालील राष्ट्रीय मुलींच्या स्पर्धा बेळगावात घेण्यात आली जवळपास राष्ट्रीय स्पर्धेत 16 संघांनी भाग घेतला होता. राजस्थान व कर्नाटक संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेचे विजेतेपद राजस्थानने पटकावले. त्याबद्दलही कौतुक करण्यात आले. चालू वर्षाच्या फुटबॉल हंगामात आंतरशालेय, आंतर महाविद्यालयीन, वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा, व बाद बदलीची फुटबॉल स्पर्धा घेण्याचे एकमताने ठरविण्यात आले. याला सभासदांनी अनुमोद दिले. या सभेत संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब उपाध्यक्ष गोपाळ खांडे, सचिव अमित पाटील, एस एस नरगोडी, प्रशांत देवदानम, रवी चौगुले, विक्रम चव्हाण पाटील, विजय रेडेकर, जॅर्ज रॉड्रिक्स, अब्दुल मुल्ला, उमेश मजुकर, आर्यन बल्लाळ उपस्थित होते.









