
पेडणे : ओस्सय.. ओस्सय.. अशा गजारात आणि वाहऽऽ वा किती आनंद झाला.. अशा पारंपरिक रोमटामेळ गीताने पेडणे शिमगोत्सवात वातावरण उत्साही झाले. पेडणे शिमगोत्सव समिती व गोवा राज्य पर्यटन खाते यांच्यावतीने आयोजित केलेल्या पेडणे शिमगोत्सव स्पर्धेत पारंपरिक रोमटामेळ, चित्ररत्र, वेशभूषा तसेच लोककला स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. स्थानिक आमदार तथा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर, नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई यांच्या उपस्थितीत शिमगोत्सव मिरवणुकीला भगवा बावटा दाखवून ढोल ताशे वाजवून सुऊवात करण्यात आली. यावेळी धारगळचे सरपंच अनिकेत साळगावकर, कोरगाव सरपंच समीर भाटलेकर, पोरस्कडे सरपंच निशा हळदणकर, कासारवर्णे सरपंच नवनाथ नाईक, चांदेल हसापूरचे सरपंच तुळशीदास गावास, हळर्ण सरपंच दिव्या नाईक, विर्नोडा सरपंच सुजाता ठाकूर, तोरसे सरपंच पार्थना मोटे, सरपंच सुबोध महाले, धारागळचे माजी सरपंच भूषण नाईक, कोरगावच्या माजी सरपंच स्वाती गवंडी, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, विविध पंचायतीचे पंच सदस्य तसेच आयोजन समितीचे सदस्य, पेडणेच्या उपनगराध्यक्ष तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका अश्विनी पालयेकर, उषा नागवेकर, विशाखा गडेकर, राखी कशालकर, नगरसेवक विष्णू साळगावकर, सिद्धेश पेडणेकर, मनोज हरमलकर, शिवराम तुकोजी, माजी नगराध्यक्ष सुविधा तेली यावेळी उपस्थित होते.
श्री देवाचा मांगर येथे नमन घालून स्पर्धांना सुरूवात
देवाला नमन करून पारंपरिक मिरवणुकीला सुऊवात करण्यात आली. घुमच कट्र घूम.. भले.. भले असे म्हणत उत्सव या पारंपरिक जयघोषाने पेडणे शहर मंगळवारी दुमदुमले. ढोल ताशांच्या तालावर पावले पडू लागली. महोत्सवात हजारो नागरिक विविध भागातून सहभागी झाले होते. यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी उपस्थिती राहून पेडणे शिमगोत्सवाचा आनंद घेतला.









