मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन, सांखळी रवींद्र भवन येथे मार्गदर्शन कार्यक्रम
सांखळी /प्रतिनिधी
राज्यातील ग्रामिण भागातील सुशिक्षित मुलांना राज्य देश व जागतिक स्तरावर वेगवेगळय़ा रोजगार संधींचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने अनिवासी भारतीय कमिशन बरोबर करार केलेला आहे. विशेष करून वैद्यकीय क्षेत्रातील विविध विभागाबरोबरच इतर अनेक क्षेत्रात उपलब्ध संधी गोमंतकीय युवकांना मिळाव्यात व स्किल इंडिया या नव्या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमचा विशेष प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पद्मीनी फाऊनडेशन व स्किल इंडिया च्या माध्यमातून सांखळी रवींद्र भवन येथे पदविधर व उच्च शिक्षित ग्रामिण व शहरी भागातील सुमारे अडीचशे मुलांच्या उपस्थितीत देश राज्य व जागतिक पातळीवर उपलब्ध संधी विविध व्यावसायिक उपलब्धी याचे मार्गसर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळे ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, संतोष मळीक विठोबा घाडी, शिखर सक्सेना, सिद्धार्थ सावकुर, रामू वेणूगोपाळीं, पूजा मयेकर, श्रीकांत गोसावी, हर्षा सक्सेना, भारती शर्मा आदी उपस्थित होते.
शेकडो उच्च शिक्षित विविध पदव्या घेऊन गप्प बसलेत त्यांना सरकारी नोकरीच हवी हा हट्ट उपयोगाचा नाही. आज कौशल भारत मंत्रालयाच्या माध्यमातून शेकडो क्षेत्रात मोठय़ा संधी आहेत. ग्रामीण मुलांना त्याचे मार्गदर्शन मिळावे या साठी हा पहिला प्रयत्न असुन सर्व भागात असे मार्गदर्शन उपक्रम हाती घेतले जातील असे डॉ सावंत म्हणाले.
वेगवेगळे उद्योग नोकरीच्या संधी आहेत त्या प्राप्त करण्यासाठी सरकार स्पर्धात्मक परीक्षा व्यावसायिक शिक्षण कौशल्य विकास मार्गदर्शन आदी चौफेर बाबतीत प्रयत्न करीत आहे. युवकांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ सरकारी नोकरी हेच ध्येय न ठेवता उत्तम व्यावसायिक बनून इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे ध्येय बाळगावे हा ही या मागचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले.
आज गोव्यात अनेक संधी आहेत मात्र गोव्याचे सुशिक्षित घरी बसून आहेत तर परराज्यातील युवक अनेक व्यावसायिक क्षेत्रात रोजगार संधी घेत आहेत हे चित्र बदलावे व गोव्याच्या ग्रामिण मुलांना ती संधी मिळावी यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगून उठा जागे व्हा व संधीचे सोने करा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
या वेळी देश पातळीकार विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहा प्रमुख वक्त्या?नी रोजगार व्यावसायिक संधी उपलब्धतता या बाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. संतोष मळीक यांनी कार्यक्रम आयोजनाची माहिती दिली
सूत्रसंचालन पूजा मायनीकर, लक्षण गावस, सर्वेश नाईक यांनी केले. उच्च शिक्षितांचा पदवी पदव्युत्तर विद्यार्थी युवकांचा पद्मनी फाऊंडेशनतर्फे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.









