आरजीच्या मनोज परबतर्फे कृषीमंत्र्यांना निवेदन
फोंडा : म्हार्दोळ येथील जायोकारांच्या बागायतींना कृषी खात्याद्धारे संरक्षण प्रदान करावे, बागायतदारांची जमिनीत कायदेशीररित्या वृक्षरोपणासाठी प्रक्रिया व आगीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा मोबदला अशा मागणीचे निवेदन (रेव्होल्युशनरी गोवन्स) आरजीचे पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी काल शुक्रवारी कृषी मंत्री रवी नाईक यांना त्याच्या फोंडा येथील कार्यालयात सादर केले. म्हार्दोळ येथे नुकत्याच लागलेल्या आगीत जायेच्या बागायतीची नुकसानी झालेली आहे. त्यानाही कृषी खात्यातर्फे आर्थिक मोबदला देण्यात यावा. सुमारे 60 जायो बागायतदारांना याचा फटका बसलेला आहे. सुमारे 1 लाख चौ.मिटर जागेत पारंपारिक जायांच्या फुलांची लागवड करण्यात येत आहे. दरम्यान काही नागरिकांनी जायांना वारसा फुल पिक म्हणून कृषी खात्याने करावी असा आग्रह धरण्यात आला होता त्dयावर विचारविनियम करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना मनोज परब यांने कृषीमंत्री रवी नाईक यांनी जायो बागायतदारांना सुरक्षेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले. राज्यातील शेतकऱ्याच्या समस्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. जायो बागायतदारांच्या जमिनी हक्क तसेच आगीत नुकसानी झालेल्या जायो बागायतीच्या पुर्नजिवितसाठी मदत मिळावून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन मंत्री रवी नाईक यांनी दिल्याचे परब यांनी सांगितले.
जायो बागायतदारांना सुरक्षा देऊ, युवकांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा
पारंपारिक जायो बागायतदारांची कुळ मुंडकार कायद्यात नावे नाहीत. त्याची नावे कुळ मुंडकार कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर शक्य असल्याची माहिती कृषीमंत्री रवी नाईक यांनी यावर बोलताना सांगितले. यासाठी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यांशी संपर्क साधणार आहेत. कृषी धोरण सद्या शेतकऱ्याच्या सुचना विश्वासात घेऊन अंमलात आणण्यात येणार आहेत. खोल येथील मिरची लागवड, उकडया तांदूळाची शेती इतर सर्व शेतकऱ्याच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. गोमंतकीय युवकांनी आपली जमिनी राखण्यासाठी कृषी खात्यातर्फे घेण्यात येणाऱ्या रोजगारांच्या संधीचा तसेच योजनाचा लाभ घेत पुढाकार घ्यावा असे आवाहन मंत्री रवी नाईक यांनी केले.









