भारतीचे सुनील मित्तल यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली
भारतामध्ये नुकत्याच झालेल्या जी20 मध्ये आफ्रिकी महासंघाला स्थायी सदस्य म्हणून समाविष्ट केले गेले आहे. भारताच्या अध्यक्षपदातील काळातील ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. आफ्रिकी महासंघ जी20 ग्रुपमध्ये सामील झाल्यावर आशिया, आफ्रिका समाविष्ट आणि लॅटिन अमेरिकाचे विकसनशील देश (ग्लोबल साउथ )आता जागतिक स्तरावर चांगले प्रदर्शन करु शकतात, असे भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी स्पष्ट केले आहे.
पहिल्यांदा जगामध्ये विकसनशील देशांचे नेतृत्व प्रदान करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना खूप धन्यवाद देतो. आफ्रिकी महासंघ जी20 गटात सहभागी होणे वास्तविक ही ऐतिहासिक घटना आहे.









