बेळगाव प्रतिनिधी– पूर परीस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गोविंद कारजोळ हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. मात्र त्या ठिकाणी आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांकडे त्यांनी कानाडोळा केला. त्यामुळे शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन निवेदन फाडून दिले. एक प्रकारे शेतकर्यांचा हा अवमान असून त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे शेतकर्यांनी म्हटले आहे. यावेळी शेतकर्यांनी संतापहि व्यक्त केला आहे.
लंपी स्कीनमुळे जनावरांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. याचबरोबर त्या जनावरांना वेळेत उपचार मिळत नाहित. त्यामुळे हि जनावरे दगावत आहेत, असा आरोप देखील करण्यात आला आहे. लसीचा तुटवडा आहे. तेंव्हा तातडीने जनावरांसाठी लस उपलब्ध करावी, आतापर्यंत 800 जनावरे या रोगामुळे दगावली असल्याचे सांगितले असले तरी त्यापेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत. खोटी आकडेवारी दिली गेली आहे, असा आरोपही करण्यात आला.
रेल्वे मार्गासाठी आणि रिंगरोडसाठी जमीन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही कोणत्याहि पारीस्थितीत जमीन देणार नाहि. कारण तिबारपिकी हि जमीन असून जर असलेली जमीनही आमची गेली तर आम्ही जीवन जगायचे कसे? असा प्रश्न ही यावेळी उपस्थित केला आहे. पालकमंत्री गोविंद कारजोळ हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वाहनांतून जात होते. मात्र त्यांनी उपस्थित असलेल्या शेतकर्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकर्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. येत्या सोमवारी जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असा इशाराहि देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन फाडून निषेध नोंदविला. यावेळी सिध्दगौडा मोदगी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन