अरगन तलावाजवळ वाहनधारकांना धोका
बेळगाव : संरक्षण खात्याकडून अरगन तलाव परिसरातील खुल्या जागेत कोट्यावधीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अरगनतलावाजवळील भुयारी गटार वाहनधारकांना धोकादायक बनल्याने याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत असूनदेखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बेळगाव-वेंगुर्ला रोडची पावसामुळे वाताहत झाली असून वाहनधारकांना या रस्त्यावरून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. विशेषत: अरगनतलाव परिसरातील रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. लक्ष्मी टेकडी परिसरातील दूषित पाणी गटारीद्वारे सोडण्यात येते. पण सदर पाणी अरगनतलावामध्ये सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे पाणी अरगनतलावामध्ये सोडण्यासाठी कित्येक वर्षापासून गांधी चौकाजवळ भुयारी गटार करण्यात आली आहे. पण भुयारी गटार असलेल्या ठिकाणचा कठडा वाहनामुळे कोसळला आहे. त्यामुळे याठिकाणी भुयारी गटार असल्याचे वाहनधारकांच्या निदर्शनास येत नाही. बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर दुचाकी वाहनांसह अवजड वाहनांची वर्दळ मोठ्याप्रमाणात आहे. अशातच अरगनतलाव परिसरातील रस्ता वाहून गेल्यामुळे ख•s निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक ख•ा चुकविण्याचा प्रयत्न करीत असतात. परिणामी याठिकाणी अपघात होण्याचा धोका आहे. भुयारी गटार असलेल्या ठिकाणी रस्ता अरूंद असल्याने काहीवेळा अवजड वाहने गटारीमध्ये अडकतात. याठिकाणी असलेल्या कठडा खराब झाल्याने वाहनधारकांना अधिक धोका निर्माण झाला आहे. भुयारी गटार असल्याचे रात्रीच्यावेळी लक्षात येत नाही. तसेच वळणावर असलेल्या भुयारी गटारीमुळे अपघात घडण्याची अधिक शक्मयता आहे. त्यामुळे भुयारी गटारीचे बांधकाम करून आवश्यक खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी कॅन्टोन्मेंटकडे सातत्याने करण्यात आली. पण सदर परिसर मिलिटरीच्या अखत्यारित येत असल्याचे सांगून कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. परिणामी वाहनधारकांना धोकादायक बनले असल्याने नाराजी व्यक्त करीत आहेत.









