67 जणांना अटक : 81 हजार रुपये जप्त
बेळगाव : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुगारी अड्डय़ांवर सुरू केलेली कारवाई दुसऱया दिवशी गुरुवारीही जिल्हा पोलिसांनी पुढे रेटली आहे. रामदुर्ग, गोकाक व बैलहोंगल तालुक्मयात आणखी सात जुगारी अड्डय़ांवर छापे टाकून 67 जणांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सात ठिकाणी जुगारी अड्डय़ांवर छापे टाकून एकूण 69 जणांवर कर्नाटक पोलीस कायदा कलम 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 67 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून 81 हजार 20 रुपये जप्त केले आहेत.
कटकोळ पोलिसांनी तीन जुगारी अड्डय़ांवर छापे टाकून 35 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 20 हजार 50 रुपये जप्त केले आहेत. कुलगोड पोलिसांनी एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकून 7 जणांवर एफआयआर दाखल केले असून यापैकी 5 जणांना अटक करून 31 हजार 640 रुपये जप्त केले आहेत. गोकाक शहर पोलिसांनी एका अड्डय़ावर छापा टाकून 7 जणांवर एफआयआर दाखल केले असून सर्व 7 जणांना अटक करून 15 हजार 450 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. नेसरगी पोलिसांनी दोन जुगारी अड्डय़ांवर छापे टाकून 20 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 13 हजार 880 रुपये जप्त करण्यात आले आहेत.









