पुणे / प्रतिनिधी :
विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्तीविषयीचे ते धमकीवजा पत्र अजित पवार यांनी लिहिलेले नाही, तर तर ते पत्र उद्धव ठाकरे यांनीच लिहिलेले होते. माजी राज्यपालांनी याबाबत जे सांगितले, ते योग्यच आहे, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला.
याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ज्यावेळी तिन्ही पक्षांचे नेते राजभवन येथे भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला गेले होते, तेव्हा राज्यपालांनी त्यांना सल्ला दिला होता. अशा धमकीच्या पत्राबाबत राज्यपाल कधीच कार्यवाही करत नाहीत. योग्य फॉरमॅटमध्ये पत्र पाठवा, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, संबंधितांचा इगो आडवा आला. त्यामुळे त्यांनी आम्ही पत्र बदलणार नाही, असे सांगितले. त्यामुळेच त्याची दखल घेतली गेली नसावी.
अधिक वाचा : उद्धव ठाकरेंसाठी आगामी काळ बिकट








